केजरीवाल यांच्याविरोधात घातपात घडवण्याचा डाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही दिवसांपासून ‘आप’चे नेते, मंत्री तपास यंत्रणांच्या निशाण्यावर असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांना केवळ अटकच नाही तर त्यांच्याविरोधात मोठा कट शिजत असून मोठा घातपात घडवण्याचा डाव असल्याचा खळबळजनक दावा सध्या अटकेत असलेले आपचे खासदार संजय सिंह यांनी केला आहे.

संजय सिंह यांना आज राऊज एवेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर कोर्टाबाहेर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केजरीवाल यांच्याविरोधात मोठा कट शिजत असल्याचा दावा केला.

संजय सिंह यांच्या कोठडीत वाढ

न्यायालयाने संजय सिंह यांना पुन्हा 24 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी त्यांना 4 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान, संजय सिंह यांनी अलीकडेच आपल्या एन्काऊंटरची शक्यताही व्यक्त केली होती.