‘आप’ची घोषणा मिशन गुजरात; विधानसभेच्या सर्व जागा लढवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आम आदमी पक्षाने आता गुजरातकडे मोर्चा वळविला असून 2022मध्ये गुजरातेत होणाऱया विधानसभा निवडणुकीत ‘आप’ सर्व 182 जागा लढविणार आहे, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

केजरीवाल हे सोमवारी गुजरात दौऱयावर आले होते. यावेळी केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार टिका केली. आता गुजरातमध्ये बदल करायची वेळ आली आहे. गुजरातच्या विकासाचे मॉडेल आपला पक्ष देईल असे ते म्हणाले.