आता ई-20 पेट्रोलविरोधात आप आंदोलन करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता ई-20 पेट्रोलच्या मुद्दय़ावरून आम आदमी पार्टीने (आप) मोदी सरकारविरोधात मोठे आंदोलन छेडण्याची तयारी केली आहे. आंदोलन अधिक तीव्र आणि मोठे होण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समस्येवर तत्काळ योग्य आणि ठोस तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषदेत केली. केजरीवाल यांनी सांगितले की, ई-20 पेट्रोलच्या वापरामुळे नागरिकांच्या गाडय़ा खराब होत आहेत. ई-20 पेट्रोलच्या विरोधात पक्षाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी येत्या शनिवारी दुपारी 12 वाजता दिल्लीतील कॉन्स्टिटय़ुशन क्लबमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत इंधन आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ञांना आमंत्रित केले जाणार असून, ई-20 पेट्रोलचे दुष्परिणाम आणि संभाव्य उपायांवर सविस्तर चर्चा केली जाईल.