‘आपलं मंत्रालय’चा नववर्ष विशेषांक प्रकाशित

378

नवीन वर्षाची नवी ऊर्जा देणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’च्या ‘नवे वर्ष नवा आनंद’ या विशेषांकाचे प्रकाशन ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या हस्ते येथे झाले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, संचालक (प्रशासन) अजय अंबेकर, संचालक (वृत्त) सुरेश वांदिले, उपसंचालक (प्रकाशने/प्रशासन) अनिल आलूरकर उपस्थित होते. या अंकाचे अतिथी संपादक प्रधान सचिव असीम गुप्ता हे आहेत.

नव्या वर्षाचे स्वागत करणाऱ्या या अंकात ‘स्वागत नववर्षाचे’ व ‘निरोगी आरोग्याची पंचसूत्री’ या विशेष लेखांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर कर्नाळ्यातील प्लास्टिकमुक्ती, उंबरखिंड, फुलपाखरांना मराठी नावे, रंगीबेरंगी डेक्कन क्वीन, मोडी लिपी, हायवे मॅनर्स, पर्यटन याबाबतच्या लेखांचा या अंकात समावेश आहे. त्याचबरोबर शुभवर्तमान व मंत्रालय परिसरातील घडामोडींचा यात समावेश करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या