तुरुंगात जाण्याच्या भीतीने विरोधकांच्या ऐक्याला सुरुंग लावण्याचा केजरीवाल यांचा प्रयत्न; काँग्रेसचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाटणामध्ये झालेल्या विरोधकांच्या बैठकीनंतर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. विरोधकांच्या ऐक्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न अरविंद केजरीवाल यांच्याकडून सुरू आहे. तुरुंगात जाण्याच्या भितीने केजरीवाल यांनी भाजपची हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते अजय माकन यांनी रविवारी केला.

एकीकडे बदली, नियुक्त्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल कचऱ्याच्या पेटीत टाकून उपराज्यपालांना अधिकार बहाल करणाऱ्या केंद्राच्या अध्यादेशाविरोधात केजरवाल काँग्रेसचे समर्थन मागत आहेत, तर दुसरीकडे राजस्थानमध्ये जाऊन काँग्रेस सरकार आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरोधात विधानं करत आहेत. विरोधकांच्या ऐक्याला सुरुंग लावणे हे एकच लक्ष्य आम आदमी पार्टीचे आहे, असे अजय माकन म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांना भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यांना तुरुंगात जाण्याच्या भीतीने ते भाजपची साथ देत आहेत. त्यांना भ्रष्टाचार केलाय असून त्यांना तुरुंगात टाकण्याची तयारी पूर्ण झालीय. त्यांचे दोन सहकारी याआधीच तुरुंगात पोहोचले आहेत. भाजपसोबत लगट करून ते त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप अजय माकन यांनी केला.