आशा पारेख यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याची घोषणा केली.  चित्रपट क्षेत्रात आणि अभिनयातील त्यांच्या भरघोस योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.  30 सप्टेंबरला नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

1959 ते 1973 या काळातल्या बॉलीवूडच्या सर्वश्रेष्ठ तारकांमधील एक तारका असा आशाजींचा लौकिक आहे. तो काळ त्यांनी अक्षरशः गाजवला.