या व्यक्तीला भेटायला आस्ताद झालाय आतूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लोणावळा

बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनचे अवघे काही दिवस उरले आहेत. या विकेंडला बिग बॉसचा विजेता कोण होणार ते ठरणार आहे. घरातून बाहेर पडायला अवघे दोन ते तीन दिवस उरलेले असताना स्पर्धकांना त्यांच्या प्रिय व्यक्तींना भेटायची उत्सुकता लागली आहे. आस्ताद काळे याला लवकरात लवकर घरातून बाहेर पडून त्याच्या एका खास व्यक्तीला भेटायची ओढ लागली आहे. त्यासाठी तो बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तो थेट पुणे गाठणार आहे.

बिग बॉसमध्येच आस्तादने एका विकेंडच्या वारमध्ये प्रेक्षकांच्या कॉलच्या वेळी त्याची घराबाहेर प्रेयसी असल्याचे मान्य केले होते. जस जसा आता घरातून बाहेर पडायची वेळ जवळ येऊ लागली आहे आस्तादला त्याची प्रेयसी अभिनेत्री स्वप्नाली पाटील हीला भेटायची उत्सुकतता लागली आहे. स्वप्नाली बद्दल अनेकदा आस्ताद घरातल्यांशी चर्चा करताना दिसला आहे. स्वप्नाली ही मेघा धाडेची खास मैत्रीण आहे. त्यामुळे मेघा देखील बऱ्याचदा या दोघांच्या लग्नाविषयी बोलताना दिसते. मेघाने तर सर्वांदेखत आस्तादला घरातून बाहेर पडल्यावर लवकरच लग्नाचा बार उडवून दे असे देखील सांगितले आहे.