
अभिजीत खांडकेकर हा लोकप्रिय मराठी अभिनेता ‘दुरंगा’ मालिकेद्वारे वेबसीरीजमध्ये पदार्पण करणार आहे. ‘दुरंगा’ ही कोरियन मालिका – ‘फ्लॉवर ऑफ इव्हील’ या सीरीजचे ते हिंदी व्हर्जन आहे. त्यामध्ये अभिजीत क्राइम रिपोर्टर विकास सोराडे व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. नऊ भागांची मालिका म्हणजे रोमॅण्टिक थ्रिलर असून त्यात गुलशन देवय्याह आणि द्रष्टी धामीसह बरखा सेनगुप्ता, राजेश खट्टर, दिव्या सेठ, झाकीर हुसेन यांच्या भूमिका आहेत.
याविषयी अभिजीत खांडकेकर म्हणाला, ‘फ्लॉवर ऑफ इव्हील’ यशस्वी ठरल्याने हीच जादू ‘दुरंगा’ देखील करेल अशी आशा वाटते. मला माझ्या ड्रीम टीमसोबत काम करण्याची संधी मिळत आहे. मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आणि माझ्या या प्रवासातही ते मला साथ देतील, अशी आशा आहे. लवकरच ‘दुरंगा’ सीरीज झी 5 वर पाहता येईल.



























































