अव्वल मानांकित प्रिन्सवर अभिनवचा विजय, महाराष्ट्राच्या दर्शन, ताराचा उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असणारा प्रिन्स दहालचे आंतरराष्ट्रीय ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान गुरुवारी संपुष्टात आले. या स्पर्धेत नेपाळच्या प्रिन्सला अव्वल मानांकन होते. पात्रता फेरीतून आलेल्या हिंदुस्थानच्या अभिनव मंगलमने त्याचा 25-23, 14-21, 22-20 असा 55 मिनिटांत पराभव केला. हा स्पर्धेतील आजचा सर्वात खळबळजनक निकाल ठरला.

महाराष्ट्राच्या दर्शन पुजारी आणि तारा शहा यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. खेलो इंडिया स्पर्धेतील विजेता दर्शनने समरवीरचे आव्हान 21-8, 22-20 असे परतवून लावले. सातव्या मानांकित तारा शहाने स्तुती अग्रवालचा प्रतिकार 21-10, 17-21, 21-6 असा मोडून काढला. ही लढत 44 मिनिटे चालली. मुलींच्या गटातून बिगरमानांकित रुजुला रामू हिने खळबळजनक निकालाची नोंद केली. तिने मलेशियाच्या सहाव्या मानांकित सिती नुरसिंहानी हिचा 20-22, 21-19, 21-11 असा पराभव केला.