बच्चन कुटुंब ‘कोरोनामुक्त’, अभिषेक बच्चनचीही कोरोनावर मात; रिपोर्ट निगेटिव्ह

772
अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत. बच्चन पितापुत्राआधी अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

 

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याने कोरोनावर मात केली आहे. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आज त्याला नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्जनंतर अभिषेक याने एक ट्विट करून याची माहिती दिली आणि चाहत्यांचे, डॉक्टरांचे, रुग्णालय कर्मचारी वर्गाचे आभार मानले.

गेल्या महिन्यात 11 तारखेला महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या रॉय-बच्चन आणि आराध्या यांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांवर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. ऐश्वर्या, आराध्या यांना सर्वात आधी डिस्चार्ज मिळाला, यानंतर बिग बी अमिताभ कोरोनातून सावरले आणि त्यांनाही घरी सोडण्यात आले. मात्र अभिषेक याच्यावर उपचार सुरू होते. आता त्याचाही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्याला आज घरी सोडण्यात आले. यानंतर त्याने ट्विट करून ही खुशखबर चाहत्यांना दिली.

आपली प्रतिक्रिया द्या