अभिषेक शर्मा टी-20 क्रमवारीत अव्वल!

हिंदुस्थानचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा हा बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत टी-20 क्रमवारीत पहिल्यांदाच ‘नंबर वन’ फलंदाज बनला आहे. तो विराट कोहली आणि सूर्यपुमार यादव यांच्यानंतर टी-20 मध्ये अव्वल स्थानी विराजमान होणारा केवळ तिसरा हिंदुस्थानी फलंदाज ठरलाय, हे विशेष. अभिषेक शर्माच्या खात्यात सध्या 829 रेटिंग पॉइंट्स आहेत.