अबीरसिंह चढ्ढाच्या माऱ्याने वांद्रे केंद्राचा विजय

नरेंद्र ताम्हाणे 19 वर्षांखालील मुलांच्या उन्हाळी शिबीर स्पर्धेत वांद्रे केंद्राच्या अबीरसिंह चढ्ढाने एमसीए अॅकेडमी ‘अ’ संघाच्या पहिल्या डावातील आघाडीचे चारही फलंदाज बाद करत त्यांची 4 बाद 82 अवस्था केली. येथेच वांद्रे केंद्राने आपली आघाडी निश्चित केली. तरीही पहिल्या डावातील वांद्रे केंद्राच्या 224 धावांना गाठून पहिल्या डावात आघाडी घेण्याचे वेदांत तोपरानी आणि दक्ष चौरसियाने प्रयत्न थोडक्यात दुर्दैवी ठरले आणि त्यांचा डाव 199 धावांवर आटोपला. त्यानंतर वांद्रे केंद्राने सावध खेळ करत 5 बाद 118 अशी मजल मारत पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर पुढच्या फेरीत आगेपूच केली.  57 धावांत 4 विकेट टिपणारा अबीरच संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

नरेंद्र ताम्हाणे यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित 19 वर्षांखालील दोनदिवसीय क्रिकेट स्पर्धेत वांद्रे केंद्राने इरफान पेणकर (54), राहुल बिनोद कुमार आणि लक्ष्य झवर (48) यांच्या खेळींमुळे सर्वबाद 223 अशी धावसंख्या उभारली होती. या धावांचा पाठलाग करताना अबीरसिंहने पहिले चारही विकेट टिपत संघाला आघाडीवर नेले. मात्र त्यानंतर वेदांत तोपरानी आणि दक्ष चौरसियाने आठव्या विकेटसाठी 56 धावांची भागी सामन्यात जीव ओतण्याचा प्रयत्न केला, पण तोपरानीचे प्रयत्न कमी पडले आणि त्यांच्या संघाला 24 धावांची पिछाडी सहन करावी लागली. हीच 24 धावांची  आघाडी वांद्रे केंद्राला पुढच्या फेरीत स्थान देणारी ठरली. आता मनोहर सावंत स्मृती चषकासाठी बाद फेरीचे सामने खेळविले जाणार आहेत.