31 जानेवारीपासून ‘म.रे.’वरही ‘AC’ लोकल, असं असेल टाईम टेबल

1293
ac-local-train

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित एसी रेल्वे अखेर मध्य रेल्वेच्या मार्गावर धावणार आहे. 31 जानेवारीपासून मध्य रेल्वेच्या प्रवाशांना ही AC लोकलची सेवा मिळणार आहे. अर्थात मध्य रेल्वेच्या ट्रान्सहार्बरवर ही सेवा सुरू होणार असून 31 जानेवारीपासूनचे ट्रान्सहार्बरच्या एसी लोकलचे वेळापत्रक रेल्वे प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहे.

ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेलहून ठाण्याच्या म्हणजेच अप दिशेने पहिली एसी लोकल सकाळी 5:44 वाजता सुटेल आणि ठाणे येथे 6:36 वाजता पोहोचेल. त्यानंतर 6:48 वाजता ठाणे येथून पहिली एसी लोकल नेरुळच्या दिशेने निघेल ती नेरुळला सकाळी 7:16 वाजता पोहोचेल. तीच लोकल नेरुळ येथून सकाळी 7:29 वाजता ठाण्याच्या दिशेने निघेल आणि ठाण्याला 8 वाजता पोहोचेल. ठाण्याहून वाशीच्या दिशेने 8:08 वाजता लोकल निघेल आणि वाशीला 8:37 वाजता पोहोचेल. 8:45 वाजता वाशीहून सुटेल आणि ठाण्याला 9:14 वाजता पोहोचेल.

पनवेल येथून ठाण्याच्या दिशेने शेवटची लोकल रात्री 8:52 (20:52pm) वाजता सुटेल तर रात्री 9:46 (21:46pm) वाजता पोहोचेल. तर शेवटची ठाणे-पनवेल एसी लोकल रात्री 9:54 (21:54pm) वाजता सुटेल ती पनवेल येथे रात्री 10:46 (22:46pm) वाजता पोहोचेल.

Thane – Panvel AC local Time Table 

From Dep. To Arrival
1 PNVL 05:44 TNA 06:36
2 TNA 06:46 NEU 07:16
3 NEU 07:29 THA 08:00
4 TNA 08:08 VSH 08:37
5 VSH 08:45 TNA 09: 14
6 TNA 09:19 NEU 09:49
7 NEU 09:57 TNA 10:27
8 TNA 10:40 BEPR 11: 19
9 PNVL 16:14 TNA 17:08
10 TNA 17:16 NEU 17:46
11 NEU 17:54 TNA 18:24
12 TNA 18:29 NEU 18: 59
13 NEU 19:08 TNA 19:38
14  TNA 19:49 PNVL 20:41
15  PNVL 20:52 TNA 21:46
16 TNA 21:54 PNVL 22: 46
आपली प्रतिक्रिया द्या