आता घरातील एसी 24 डिग्रीवर चालणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थंडीचा मोसम संपल्यावर उन्हाळ्यात घरात नवीन एसी घेण्याचा विचार करत असाल तर नवे नियम माहिती करून घ्या. आता नकीन एसी खरेदी केल्यास तो 16 नव्हे तर 24 डिग्री सेल्सियस तापमानावर सुरू होईल. सर्व कंपन्यांच्या एसीमध्ये डिफॉल्ट तापमान 24 डिग्री सेल्सियस राहील. ऊर्जा मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार नववर्षात नव्या सेटिंगचे नवे एसी तयार केले जात आहेत.

याआधी 16 किंवा 17 डिग्रीपर्यंतचे तापमान डिफॉल्ट तापमान म्हणून ठेवता येत होते. याबाबत  ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सीने (बीईई) सरकारसोबत चर्चा करून काही नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यासंबंधीची अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. हा नियम 1 जानेकारी 2020 पासून लागू झाल्याने नकीन एसी तयार करणाऱ्या सर्क कंपन्यांना हा नियम लागू झाला  आहे. नव्या नियमांनुसार एसी सुरू केल्यानंतर डिफॉल्ट सेटिंग 24 अंश असेल, पण नंतर तुमच्या सोयीप्रमाणे  एसीच्या तापमानात बदल करता येणार आहे.

तापमानातील बदल आणि वाढत्या उष्णतेचा विचार करता 2050 पर्यंत हिंदुस्थानात एसीचे प्रमाण सर्वाधिक राहील, त्यामुळे एसीची मागणी जास्त असेल. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या अहवालानुसार एसीच्या खरेदीत 4206 टक्क्यांनी वाढ होईल.

कार्बन उत्सर्जनात मोठी घट

बीईईने फिक्स्ड-स्पीड रूम एअर कंडिशनर्ससाठी स्टार लेबलिंग प्रोगाम सुरू केला होता. त्याची अंमलबजावणी 12 जानेकारी 2009 साली करण्यात आली. त्यानंतर 2015 साली इन्व्हर्टर रूम एअर कंडिशनर्ससाठी स्वैच्छिक स्टार लेबलिंग प्रोग्रॅम लाँच केल्यानंतर तो  1 जानेवारी 2018 रोजी लागू करण्यात आला. रूम एअर कंडिशनरच्या स्टार लेबलिंग प्रोग्रॅमने केकळ 2017-18 या आर्थिक कर्षात 4.6 अब्ज युनिट ऊर्जेची बचत केली आहे. तसेच 3.8 कोटी टन कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत केली आहे.