एसी 24 अंशावर होणार लॉक, तापमान वाढीला आळा घालण्यासाठी केंद्र घेणार निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

जागतिक तापमान वाढीविरोधात अनेक देशांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. जागतिक तापमान वाढ आणि विजेच्या समस्यांशी मुकाबला करण्यासाठी आता हिंदुस्थाननेही पुढाकार घेतला असून एसीचे (एअर कंडिशनर)चे किमान तापमान 24 अंशावर लॉक करण्याचा निर्णय केंद्र सरकार लवकरच घेणार आहे. त्यामुळे विजेची बचत होऊन जागतिक तापमान कमी होण्यास मदत होणार आहे.

विजेची बचत करण्यासाठी सरकारने लोकांना स्वस्त दरामध्ये एलईडी बल्ब उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे आता जुन्या एअरकंडिशनर्सच्या जागी सवलतीच्या दरांमध्ये विजेची बचत करणाऱ्या आणि कमी प्रदूषण करणारे ‘इर्न्व्हटर एसी’सारखे नवीन एसी आणण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेटिंग, एअर कंडिशनिंग इंजिनीअर्स’ (इशरे)ने दिली आहे. मुंबईत नुकतेच मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्लबिंग विषयावर नॅशनल प्रोग्रॅम ‘सिम्पोसिया-2019’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ही माहिती देण्यात आली.