पोलीस ठाण्यांच्या इमारत बांधकामांना गती द्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई उपनगर जिह्यामध्ये जिल्हा विकास निधीतून बांधण्यात येणाऱ्या पोलीस ठाणे इमारतींच्या कामाचा आज पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. ही कामांना अधिक गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले.

उपनगरामध्ये जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वाकोला, मेघवाडी, गोरेगाव आणि मालाड पोलीस ठाणे इमारतीच्या बांधकामाकरिता 37.95 कोटी रुपयांचा निधी मान्य करण्यात आला आहे. यापैकी 8 कोटी रुपयांचा निधी राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ यांना वर्ग करण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या पोलीस ठाण्यांच्या इमारत बांधकामातील अडचणी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने सोडवून हे काम गतिमान करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या. या बैठकीला गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम पुंटे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, अपर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपनगरांमध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून आणखीन 5 पोलीस ठाण्यांकरिता नवीन इमारत बांधण्याबाबत पोलीस विभागाने केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने चर्चा झाली.