अभिनेता प्रतीक बब्बर विरोधात गोव्यात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पणजी

दिग्गज अभिनेते आणि काँग्रेस नेते राज बब्बर यांचा मुलगा बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बर याच्याविरोधात गोव्यात गुन्हा दाखल करण्य़ात आला आहे. मोटार वाहन कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीकविरोधात वेगाने कार चालवून एका स्कुटरला धडक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

एएनआआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, गोव्यातील स्थानिक तरुण पाओलो कोरिया याने प्रतीकविरोधात पोलिसात रफ ड्रायव्हींगची तक्रार दाखल केली. रफ ड्रायव्हींग दरम्यान प्रतीकने आपल्या स्कुटरला धडक दिली आणि मला व माझ्या बहिणीला धमकी दिली, असा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच प्रतीक यावेळी वन वे वरून आपली मोटार चालवत असल्याचा आरोप फिर्यादीने केली आहे. या तक्रारीनंतर प्रतीक बब्बरविरोधात पोलिसांनी मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या दरम्यान प्रतीकने देखील तरुणाविरोधात तक्रार दाखल केली असून त्याने कारची काच फोडल्याचा आरोप लगावला आहे.