कराडच्या चरेगावमध्ये अपघातात दुचाकस्वाराचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
accident

कराड तालुक्यातील चरेगावच्या हद्दीत पाटण-पंढरपूर राज्य मार्गावर भोळाईनगर येथे आयशर टेम्पोने दुचाकस्वाराला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अभिजीत रामचंद्र देसाई (वय 20) असे अपघातातील मृताचे नाव आहे.

आयशर टेम्पो पाटणकडून उंब्रजकडे भरधाव वेगाने येत होता. त्यादरम्यान दुचाकीस्वार अभिजीत देसाई (वय 20, रा. बिबवी, ता. पाटण) हा उंब्रजकडून येत असताना टेम्पो चालकाने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. त्यामुळे अभिजीत यांचा मृत्यू झाला. त्यानंतर चालकाने टेम्पो जागेवरच सोडून तेथून पोबारा केला. उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक लक्ष्मण जगधने अधिक तपास करीत आहेत.