
मालवणहून कुडाळच्या दिशेने जाणार्या मुंबईतील चाकरमान्यांच्या कारचा मालवणात अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन रस्त्यालगतच्या गटारात कलंडली. सुर्दैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. साळेल नांगरभाट येथील कुपेरीच्या घाटीत सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला.
मुंबईतील चाकरमान्यांची मोटार मालवणहून कुडाळच्या दिशेने जात होती. कुपेरीच्या घाटीत मोटार आली असता मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने ब्रेक लावला. त्यामुळे मोटार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला मालवणला बाजूने वळली आणि रस्त्यालगतच्या गटारात जात कलंडली. गाडीत चालकासह दोन महिला तसेच अन्य एक असे चारजण होते. सुर्दैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. अपघात झाल्याचे कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. क्रेनच्या साहाय्याने गटारात कलंडलेली मोटार बाहेर काढण्यात आली. अपघातात मोटारीचे नुकसान झाले आहे.




























































