परभणी-पाथरी रस्त्यावर अपघात; एकाचा मृत्यू, दोनजण जखमी

परभणी-पाथरी रस्त्यावर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर 12.45 वाजण्याच्या सुमारास तवेरा गाडी आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.

पाथरी रस्त्यावरील शहरापासून जवळच असलेल्या इसार पेट्रोलपंपासमोर तवेरा व मोटरसायकलची धडक झाली. या अपघातात गणेश कैलासराव काकडे (वय 30) या तरुणाचा मृत्यू झाला. या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात दुचाकीचा चक्काचुर झाला. तर तवेरा गाडीचेही नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

आपली प्रतिक्रिया द्या