जनता अपघात विमा पोटी सभासदांना १० कोटीं रुपये वाटप

35

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जनता अपघात विम्यापोटी बँकेच्या शेतकरी सभासदांना १० कोटी ६६ लाख, ४२ हजार रुपये मयत झालेल्या एक हजार सभासदांना इन्शुरन्स कंपनीकडून बँकेला प्राप्त झाले त्यांना बँकेच्या वतीने देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन अॅड. श्रीपतराव काकडे यांनी येथे बोलताना दिली.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने अपघात विमाचे मयताच्या वारसांना चेक वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बँकेचे संचालक नाथ सिंह देशमुख, यशवंतल, भगवानराव पाटील विजयनगरकर, अॅड. प्रमोद जाधव, बँकेचे कार्यकारी संचालक एच. जे. जाधव उपस्थित होते.

पुढे बोलताना अॅड. काकडे म्हणाले की, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १ लाख ९९ हजार सभासदांचा इन्शुरन्स कंपनीकडून विमा काढलेला आहे, असे सांगून बँक ही शेतकऱ्यांची आहे. प्रत्येक वेळी अडीअडचणीला धावून जाणारी बँक असून अपघातात मृत्यू पावलेल्या लातूर जिल्ह्यातील १० सभासदांना १४ लाख रुपये त्यांच्या वारसांना देण्यात आले. आजपर्यंत १० कोटी रुपये वाटप करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. अपघात विमा योजनेत कैलासवासी हरिश्चंद्र बनकर(बोरफळ) बळवंत घाडगे (तुंगी) श्रीधर गवळी (भा दा) ओमप्रकाश कदम (वांजरखे डा) मोहन पांचाळ (बोरी) आत्माराम पवार(कोळगाव) विश्वनाथ वडस्कर(कोळगाव) हरी पवार (ह डोळती) शरण्णापा हालाले(उजना) केरबा ढगे (हेर) या मयताच्या वारसांना प्रत्येकी एक लाख, तर ४ सभासदांना २ लाख रुपये चेक आज वितरण करण्यात आले.

याप्रसंगी बँकेचे कर्ज वसुलीप्रमुख तानाजी जाधव, लेखा परीक्षणप्रमुख बी.वी. पवार उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोगरगे यांनी केले

आपली प्रतिक्रिया द्या