भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले; पिंपळगावातील दोन चुलतभावांचा मृत्यू

राष्ट्रीय महामार्गावरील जाडगाव फाट्यानजीक भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील दोन चुलतभावांचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सोपान रमेश मावळे ( वय 19) व सचिन सुभाष मावळे ( वय 18) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी ट्रक चालकाविरूध्द वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोपान रमेश मावळे (19) व सचिन सुभाष मावळे (18) हे दोघे दुचाकीने दीपनगर येथून घरी परत येत असताना जाडगाव फाट्यानजीक समोरून येणारा ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात सचिनचा जागीच मृत्यू झाला. तर सोपानला गंभीर अवस्थेत वरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेत असताना त्याचाही मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या