
बीड -संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील उड्डानपुलावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बीड दंगल नियंत्रण पथकाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. गेवराई तालुक्यातील गढी गावाजवळ ही दुर्घटना घडली.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, बीड येथे दंगल नियंत्रण पथकात कार्यरत असनारे आकाश सुदामराव यादव (वय 23 ) शुक्रवारी दुचाकीने बीडकडे जात असताना तालुक्यातील गढी गावाजवळील उड्डानपुलावर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेने ते गाडीवरून लांब फेकले गेले. त्यामुळे गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी यादव यांना गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांचा मृत्यू झालाचे डॉ. एस.एस दागंट यांनी घोषित केले.
आपली प्रतिक्रिया द्या