क्षेपणास्त्र पाकिस्तानात कोसळले; कॅप्टन दोषी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रम्होस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानात पडल्याची घटना 9 मार्च रोजी घडली होती. त्या घटनेच्या चौकशीत हवाई दलातील ग्रुप कॅप्टन दर्जाचा अधिकारी दोषी आढळला आहे. हा ग्रुप कॅप्टन त्यावेळी क्षेपणास्त्र प्रणालीच्या मोबाईल कमांड पोस्टचा प्रभारी होता. त्यामुळे तो प्रथमदर्शनी दोषी आढळला आहे. हवाईदल मुख्यालयातील एअर व्हाईस मार्शल (ऑपरेशन्स) हे या प्रकरणाची चौकशी करत आहेत. नियमित तपासणीदरम्यान ही घटना घडली होती अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली.