माँसाहेब मीनाताई ठाकरे जीवनगौरव पुरस्काराने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माँसाहेब मीनाताई ठाकरे जीवनगौरव पुरस्काराने महाराष्ट्रातील 25 कर्तृत्ववान महिला व युवतींचा सन्मान रविवारी परळच्या शिरोडकर हायस्कूल येथे करण्यात आला.

परळच्या सुभाष डामरे मित्र मंडळ आणि शिवराज प्रतिष्ठानचे संस्थापक आनंद गांवकर व संचालक, आमदार महेश सावंत आणि लोकसभा समन्वयक सुधीर साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माँसाहेब मीनाताई ठाकरे जीवनगौरव पुरस्काराने दरवर्षी कर्तृत्ववान महिला आणि युवतींचा सन्मान करण्यात येतो. रविवारी परळच्या शिरोडकर हायस्कूल येथे झालेल्या सोहळ्यात संचालिका, माजी नगरसेविका उर्मिला पांचाळ, विधानसभा संघटक रूपाली चांदे, माजी नगरसेविका जया गोयथळे, लता रहाटे, भारती पेडणेकर, विद्या राबडीया यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांना गौरविण्यात आले.

यावेळी अलका रवाळे, तृप्ती पवार, कविता ससाणे, नीलाक्षी चेंदवनकर, वर्षा कोसंबिया, कल्पना जाधव, अध्यक्ष नाना फाटक, कार्याध्यक्ष प्रभाकर मोरजकर व रूपेश कोचरेकर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सुवर्णा गुराम, नीलम मिरगळ, कविता पाटील, श्रेया जामदार, मयुरी परब यांनी केले.