देशातील टॉपच्या कंपन्यांमध्ये आर्थिक वर्ष 2024 मध्ये लैंगिक शोषणाच्या तक्रारी 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. कॉर्पोरेट पारदर्शकतेच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. ‘कॉम्पलकरो’च्या आकडेवारीनुसार, लैंगिक शोषणाच्या तक्रारींमध्ये 40.4 टक्के वाढ झाली आहे. त्यामध्ये मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 268 अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. बँकिंग आणि टेक्नोलॉजी सेक्टरमधील तक्रारी वाढल्या आहेत. लैंगिक शोषणविरोधी कायद्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होतेय. लैंगिक शोषणाची तक्रार करण्यासाठी कंपन्यांही महिला कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करत आहेत. कंपन्यांच्या प्रयत्नांमुळेही अत्याचाराविरोधातील तक्रारी वाढल्या आहेत. महिला व कंपन्यांमध्ये अधिक जागरुकता निर्माण झाल्याने अत्याचाराविरोधी तक्रारींमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे.
बँकिंग आणि टेक कंपन्यांत जास्त तक्रारी
लैंगिक शोषणाच्या जास्त तक्रारी बँकिंग आणि टेक्नोलॉजी सेक्टरमधून येत आहेत. या सेक्टरमध्ये युवा आणि महिलांची संख्या अधिक असते.
n आयसीआयसीआय बँकने आर्थिक वर्ष 2024 मध्ये लैंगिक शोषणाच्या 133 तक्रारी नोंदवल्या, तर 2023, 2022, 2021 साली अनुक्रमे 43, 46 आणि 33 तक्रारींची नोंद झालेय.
n टीसीएसमध्ये 2024 साली 110 प्रकरणांची नोंद झाली. 2023, 2022, 2021 साली अनुक्रमे 49, 36 आणि 27 तक्रारींची नोंद झालेय.
n इन्पहसिसमध्ये या वर्षी लैंगिक शोषणाच्या 98 तक्रारी नोंदवल्या गेल्या, तर टेक महिंद्रा कंपनीमध्ये 93 प्रकरणांची नोंद झाली.
n एचडीएफसी बँकेने 2024 मध्ये 77 तक्रारी नोंदवल्या. ऑक्सिस बँकेने 36 प्रकरणे नोंदवली. टाटा स्टीलमध्ये 21 घटनांची नोंद झाली.