60 हजारांहून अधिक रुग्ण कीडनीच्या प्रतीक्षेत

देशात अवयव दानाचे प्रमाण कमी आहे. मात्र हळूहळू अवयव दानाची जनजागृती होत आहे. परिणामी परिस्थितीत बदल होत आहे. पण मृत अवयवदानाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे प्रत्यारोपणासाठी जिवंत दात्यावर अवलंबून राहते. यातही महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे. देशात कीडनी ट्रान्सप्लांटच्या प्रतीक्षेत 60 हजार पेक्षा अधिक रुग्ण असल्याचे सरकारी आकडेवारीवरून समजते.

मागील पाच वर्षांच्या अवयव प्रत्यारोपणाच्या वेटींग लिस्टबद्दलची आकडेवारी राज्यसभेत देण्यात आली. त्यानुसार, 60 हजारांहून अधिक रुग्ण कीडनी प्रत्यारोपणाची वाट पाहत आहेत. यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत 18 हजार रुग्ण आहेत. हृदय प्रत्यारोपणाचे  1695 रुग्ण तर फुफ्फुस प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत 970 जण आहेत. अशातर्हेने 82285 रुग्ण अवयव प्रत्यारोपणाची वाट पहात आहेत.