श्रीरामपूर येथील हनुमान मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपींना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीरामपूर येथील हनुमान मंदीराचा पितळी कळस आणि पितळी घंटा चोरणाऱ्या आरोपींना अटक करण्यात श्रीरामपूर शहर पोलिसांना यश आले आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील हनुमान मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली होती.

या प्रकरणी भाऊसाहेब मुळे (वय 64, रा. मोरगेवस्ती) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार चारजणांना अटक करण्यात आली असून त्यात दोन अल्पवयीनांचा समावेश आहे. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुली दिली.

पोलिसांनी नागेश हासे (वय 19, रा. बजरंग चौक, प्रभाग दोन), सोमनाथ उर्फ लेमन साळवे (रा. शनिचौक, प्रभाग दोन) यांच्यासह दोन अल्पवयीन चोरट्यांना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून दहा हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक समाधान सुरवाडे, पोलीस हवालदार जोसेफ साळवी, पोलीस नाईक गणेश भिंगारदे, अमोल जाधव, किशोर जाधव, अमोल गायकवाड यांनी ही कारवाई केली.