कोपरगाव पत्नीच्या खुनातील फरार आरोपीला पाच दिवसांनी अटक; तीन दिवसांची पोलीस कोठडी

भांडणाच्या रागातून पत्नीचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करून पती फरार झाला होता. कोपगावात झालेल्या या घटनेतील आरोपी विजय ऊर्फ बंडू आप्पासाहेब गवळी (रा. मढी खुर्द) याला पाच दिवसांनी अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीच्या डोक्यावर शस्त्राने वार करून तिची हत्या करण्यात आली होती. ही घटना 13 मे रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली होती. त्यानंतर आरोपींनी तेथून पोबारा केला. सोमवारी आरोपीला लोणीकंद (ता. हवेली, जि. पुणे) येथून पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी (संगमनेर) राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, पोहेकॉ. इरफान शेख, पोकॉ. अंबादास वाघ, पोकॉ. रमेश झडे व सायबर सेल श्रीरामपूर येथील पोना. फुरखान शेख यांनी ही कारवाई केली.

आपली प्रतिक्रिया द्या