
सोशल मीडियावर ओळख झालेल्या महिलेला लग्नाचे आमिष देऊन आणि तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तिची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला उत्तराखंडमधील कोर्टाने 19 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. दीपक सिंह असे या आरोपीचे नाव असून कोर्टाने त्याला 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. जर दंड भरला नाही तर शिक्षेत आणखी एका महिन्याची वाढ होईल. दीपक सिंहविरोधात 29 जानेवारी 2020 रोजी महिलेने फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती.