प्राचार्यांनी ऍसिडहल्ला केल्याची विद्यार्थिनीची तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रविवारी सकाळी मॉर्निंग वॉक करीत असताना 16 वर्षीय विद्यार्थिनीवर भांडूप येथील एका शाळेच्या प्राचार्यांनी ऍसिडहल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पार्कसाइट पोलीस ठाण्यात प्राचार्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलगी सध्या माहीम येथील एका महाविद्यालयात शिकत आहे. 2018 मध्ये तिने ती शिकत असलेल्या शाळेतील एका शिक्षकाविरोधात तक्रार दिली होती. त्याच रागातून त्या शाळेच्या प्राचार्याने रविवारी सकाळी मुलगी मॉर्निंग वॉक करीत असताना तिच्यावर ऍसिडहल्ला केला. यावेळी त्याच्यासोबत शिक्षक आणि शाळेचे दोघे कर्मचारी होते. घडला प्रकार मुलीने फोनवरून सांगताच तिच्या वडिलांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तिला राजवाडी रुग्णालय मग तेथून पुढे शीव रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार केल्यानंतर तिला सोडण्यात आले. दरम्यान, आरोपी व पीडित मुलगी एकमेकांना ओळखल असून मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक नसून तपास सुरू असल्याचे पार्कसाइट पोलिसांनी सांगितले.