
ई-बाईक टॅक्सीविषयक धोरण राज्य सरकारकडून निश्चित झालेले नसतानादेखील मुंबईत बाईक टॅक्सी सर्रास धावत आहेत. अशा प्रकारे अनधिकृत प्रवासी वाहतूक करणाऱ्या 57 बाईक टॅक्सींवर परिवहन विभागाने कारवाई केली आहे. दोषी चालकांकडून दीड लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहे. रॅपिडो, ओला, उबर या पंपन्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार आहे, अशी माहिती परिवहन विभागाने दिली.