रायगड जिल्ह्यातील चार आमदारांसह 1646 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

1304

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील चार आमदारांवर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 149 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. चार आमदारांसह 1646 जणांवर ही कारवाई पोलिसांनी केली आहे. आमदार जयंत पाटील, पंडित पाटील,  धैर्यशील पाटील आणि अनिकेत तटकरे यांना याबाबत पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. तर 37 जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव आहेत.

निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक काळात गुन्हे असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. जिल्ह्यात 1646 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. प्रतिबंधक कारवाई केलेल्या व्यक्तींना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे.  निवडणूक काळात नोटीस बजावलेल्या व्यक्तींनी कायद्याचे पालन केले नाही तर त्यांच्यावर 188 नुसार कायदेशीर कारवाई केली जाते. लोकसभा निवडणुकीत मतमोजणी वेळी पारपत्र नसताना अनधिकृतपणे घुसून आमदार जयंत पाटील, पंडित पाटील यांनी पत्रकाराला मारहाण केली होती. यावेळी पेणचे आमदार धैर्यशील पाटील, विधानपरिषद सदस्य अनिकेत तटकरे हे सुद्धा उपस्थित होते. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या