कोरोना बाधिताची वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर पसरविल्यास कारवाई

387

परभणी जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णासंबंधीची वैयक्तिक माहिती इतर संवेदनशील माहिती सोशल मीडियावर पसरविल्यास कारवाई करण्यात येईल. जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी ही माहिती दिली.

जिल्हा प्रशासन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व प्रकारे सज्ज असुन खबरदारीचा भाग म्हणुन सर्व प्रकारच्या अत्यावश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे जिल्हावासियांनी अफवांवर विश्वास ठेवुन घाबरून जाऊ नये तसेच कुठल्याही अफवांना बळी पडु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी केले आहे. सद्यस्थितीत आजपर्यत जिल्ह्यामध्ये 1६ कोरोना पॉझिटिव्ह असून 15 रुग्ण वैद्यकिय निगराणीखाली आहेत. सर्व रुग्ण औषधोपचारास योग्य तो प्रतिसाद देत आहेत व त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर एक रुग्ण यापुर्वीच कोरोनामुक्त झालेला आहे.

परभणी जिल्हा रुग्णालयात पूर्वीचे 1 हजार 577 व आज रोजी दाखल झालेले 101 असे एकुण 1 हजार 678 संशयितांची नोंद झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह स्वॅब अहवालानुसार यापुर्वीच सोनपेठ तालुक्यातील शेळगाव, गंगाखेड तालुक्यातील नागठाणा व पुर्णा तालुक्यातील माटेगाव तसेच परभणी तालुक्यातील पिंपळगाव हे प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात  जिल्हा आरोग्य आधिकारी कार्यालयामार्फत पथक तयार करण्यात आले असून सील केलेल्या परिसरातील प्रत्येक घरात सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले आहे. असेही जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या