खेडमध्ये प्लस्टिक विरोधी मोहीम तीव्र; प्लास्टिक पिशव्या ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांना दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेड शहरामध्ये प्लास्टिक विरोधी मोहीम पुन्हा एकदा तीव्र करण्यात आली आहे. ज्या व्यावसायिकांकडे प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या त्यांच्यावर नगरपालिका प्रशासनाने कारवाई केली आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशव्या ठेवणारे व्यावसायिक धास्तावले आहेत.

शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा 2 अंतर्गत मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी शहरात प्लास्टिक विरोधी मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेदरम्यान नगरपालिका प्रशासनाने दुकानांमध्ये जाऊन तपासणी केली असता काही दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. ज्या दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्या आढळल्या त्या दुकान मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

खेड नगरपरिषद कार्यालय प्रमुख रजनीकांत जाधव, स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगावकर, ज्ञानेश्वर सुतार, राजेंद्र तांबे, सुबोध जाधव तसेच नागरपालिकेचे अन्य कर्मचारी यांनी खेड शहरातील पानटपऱ्या, स्वीटमार्टस, फळे, भाजीपाला विक्रेते या ठिकाणी जाऊन प्लास्टिक पिशव्या न वापरण्याबाबत जनजागृती केली.