
ऊस गाळप परवान्याकरता साखर कारखान्यांचे ऑनलाइन अर्ज उद्यापासून 30 सप्टेंबरपर्यंत स्वीकारले जाणार आहेत. गाळप परवाना असल्याशिवाय कोणत्याही साखर कारखान्याला साखर उत्पादन करता येणार नाही. विनापरवाना ऊस गाळप सुरू केल्यास कारवाई करण्याचा इशारा साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी दिला आहे.
साखर आयुक्तालयाकडून ऊस गाळप परवान्यासाठी कालबद्ध कार्यक्रम देण्यात आला आहे. गाळप परवाना फी व अनामत रक्कम भरणा करावयाची आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा गतवर्ष 2024-25 मधील ऊस गाळपावर प्रति टन पाच रुपयांप्रमाणे भरावयाचा आहे. तर साखर संकुल निधी हा गतवर्ष हंगाम 2024-25 मधील ऊस गाळपावर प्रति टन 50 पैसे असेल.
यंदाच्या हंगामासाठीच्या उसाच्या उपलब्धतेची माहिती संकलित करून ती अंतिम करण्याचे काम सुरू आहे. मात्र, गतवर्षी झालेल्या 853 लाख मेट्रिक टन ऊस गाळपापेक्षा यंदा अधिक ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल.’
– सिद्धाराम सालीमठ, साखर आयुक्त