कल्याणसिंह यांच्यावर कारवाई होणार; राष्ट्रपतींची गृहखात्यास शिफारस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन करणारे वक्तव्य उत्तर प्रदेशात अलिगढ येथे केल्याप्रकरणी राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंह हे गोत्यात येण्याची शक्यता आहे. या वक्तव्याबाबतचा आपला अहवाल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केंद्रीय गृहखात्याकडे पाठवला आहे. या अहवालात सिंह यांच्यावर कारवाई करावी असे राष्ट्रपतींनी म्हटल्याचे समजते.

कल्याणसिंह यांच्याकडून निवडणूक आचारसंहितेचा कथित भंग झालेला आहे, असा अहवाल निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींकडे पाठवला. यानंतर राष्ट्रपतींनी शिफारस केलेला अहवाल गृहखात्याकडे आलेला आहे. भाजपने विजयी व्हावे असे मला एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मनापासून वाटते. मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत ही आमची इच्छा आहे असे वक्तव्य त्यांनी केले होते.