खरा अल्लू अर्जुन कोणता…

दक्षिणेचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचे चाहते जगभरात आहेत. नुकताच दुबईतील मादाम तुसाद संग्रहालयात अल्लू अर्जुनचा मेणाचा पुतळा साकारण्यात आला आहे. मेणाच्या पुतळय़ाचे काही फोटो अल्लू अर्जुनने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मेणाचा पुतळा इतका हुबेहुब बनवलाय की, खरा अल्लू अर्जुन कोणता ओळखणे कठीण झाले आहे.

मादाम तुसाद म्युझियमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अल्लू अर्जुनचा मेणाचा पुतळा आहे. ‘ द बिग रिव्हिल, अल्लू अर्जुनने दुबईतील त्याचा मेणाचा पुतळा पाहिला’ अशी पॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.  मादाम तुसाद म्युझियमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आणखी एक पह्टो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये अल्लू अर्जुन हा त्याच्या मेणाच्या पुतळय़ासोबत उभा असलेला दिसत आहे. त्याने ‘पुष्पा’ चित्रपटातील खास पोझ दिली आहे. अल्लू अर्जुनने स्वतःचा मेणाच्या पुतळय़ासोबतचा पह्टो शेअर करून कॅप्शनमध्ये ‘देअर यु गो’ असे लिहिले आहे. त्याच्या फोटोवर चाहत्यांनी लाईकचा वर्षाव केला आहे