
कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले. अशीच वेळ अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिच्या वयस्क चुलत काकांवरदेखील आली आहे. पुण्यातील एका फुटपाथवर टेबल मांडून कॅलेंडर आणि इतर वस्तू ते सध्या विकत आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या काका आणि आत्या यांना मदत करण्याचे आवाहन भार्गवीने सोशल मीडियावरून केले आहे.
भार्गवीने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोन वृद्ध एका फुटपाथवर टेबल मांडून विविध वस्तूंची विक्री करताना दिसत आहेत. पोस्टमध्ये भार्गवी म्हणाली, हे माझे चुलत काका आणि आत्या आहेत. आम्ही पुटुंबीय सगळे काही ना काही मदत त्या दोघांना करतच असतो. पण शेवटी आत्मनिर्भर स्वभाव आहे त्यांचा, म्हणून माझ्या पुण्यातल्या मित्र मैत्रिणींना मी विनंती करते की, तुमच्यापरीने जी मदत होऊ शकेल त्या वस्तू विकत घेण्याच्या निमित्ताने तेवढी करा.



























































