अभिनेते, दिग्दर्शक मनोहर शिंदे यांचे निधन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक मनोहर शिंदे यांचे काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झोपेतच निधन झाले, ते 70 वर्षांचे होते. मनोहर शिंदे यांनी बंदिनी, परमवीर, हॅलो इन्स्पेक्टर आणि रणांगण या मराठी मालिकांसह अन्य चित्रपटातही भूमिका साकारल्या. अधिकारी बंधूंच्या मालिकांमध्ये मनोहर शिंदे यांच्या भूमिका हमखास असत. कामगार आणि व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी अनेक नाटके दिग्दर्शित केली आहेत, कामगार रंगभूमीवर त्यांच्या ‘माझं काय चुकलं’ या नाटकाला कामगार रंगभूमीच्या स्पर्धेमध्ये अनेक पारितोषिक मिळाली आहेत. शिवसेनेचे माजी उपविभाग प्रमुख अशोक शिंदे आणि ज्येष्ठ पत्रकार सदानंद शिंदे यांचे ते थोरले बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी मनीषा, मुलगा मनोज, कन्या अपर्णा आणि प्रेरणा, जावई राकेश खाडय़े, शिरीष अरसुले आणि देविका, मिहिका या नाती असा परिवार आहे. टागोरनगर, विक्रोळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. एका हरहुन्नरी अभिनेत्याच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.