अभिनेता मनोज बाजपेयी यांच्या वडिलांचा मृत्यू, दिल्लीत सुरू होते उपचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुप्रसिद्ध अभिनेता मनोज बाजपेयीचे वडिल राधाकांत बाजपेयी यांचा मृत्यू झाला आहे. राधाकांत बाजपेयी अनेक दिवसांपासून आजारी होते. काही आठवड्यांपूर्वीच त्यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना दिल्लीच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर गावात शोक निर्माण झाला आहे. राधाकांत बाजपेयी बिहारच्या बेतिया शहराजवळील बेलवा गावाचे रहिवासी होती.

सप्टेंबर महिन्यात मनोज बाजपेयी यांच्या वडिलांची तब्येत बिघडली होती. तेव्हा मनोज बाजपेयी केरळमध्ये शूटिंग करत होते. वडिलांच्या तब्येतीची बातमी मिळाल्यानंतर मनोज बाजपेयी यांनी चित्रिकरण थांबवले आणि वडिलांजवळ पोहोचले. वडिलांची तब्येत सुधारल्यानंतर मनोज बाजपेयी परत शुटिंगसाठी परतले होते.