सरकारचा प्रचार करणारे सिनेमा बनवले जात आहेत, नाझी जर्मनीत हेच व्हायचे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी चित्रपट उद्योग ही इस्लामोफोबियाने ग्रासलेली असल्याचे सांगत अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी केंद्र सरकारवरदेखील निशाणा साधला आहे. सरकारकडून अनेक फिल्म मेकर्सना असे सिनेमा बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे ते म्हणाले. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नसीरुद्दीन शहा म्हणाले की, तुम्ही जेवढे जास्त पैसे कमवता तेवढा इथे तुमचा जास्त आदर केला जातो. आजही इंडस्ट्रीमध्ये तीन खान टॉपला आहेत. मला तर करिअरच्या सुरुवातीलाच नाव बदण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र मी माझे नाव बदलले नाही असे ते म्हणाले. फिल्म इंडस्ट्रीला आता सरकारकडून त्यांच्या विचारांचं समर्थन करणारे सिनेमा बनवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. सरकराच्या कामगिरीचं कौतुक करणारे सिनेमा बनवले जातात. सरकारच्या या कामाची तुलना नसीरुद्दीन शहा यांनी नाझी जर्मनीसोबत केली.

नाझी जर्मनीमध्ये असेच होत होते. उत्तम सिनेनिर्मिती करणाऱ्य़ा फिल्म मेकर्सना नाझी विचारसरणीचा प्रचार करणारे सिनेमा बनवण्यासाठी सांगितले जायचे. माझ्याकडे याचा सबळ पुरावा नसला तरी सध्या ज्या प्रकारचे मोठे सिनेमा येत आहेत यावरून आपण अंदाज घेऊ शकतो, असे ते म्हणाले.