मतदार यादीतून माझे नाव वगळले, अभिनेते प्रकाश राज यांचा संताप; मोदी सरकारवर केली टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकात सध्या सुरू असलेल्या SIR मोहिमेदरम्यान बंगळुरूच्या मतदार यादीत प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांचे नाव नसल्याचे समोर आले आहे. प्रकाश राज यांनी स्वत: . सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली. त्यांनी या बाबत संताप व्यक्त करत या प्रकाराला ‘एक विनोद’ असे म्हटले आहे.

“डिअर फ्रेंड्स.. साथिओं.. मला एक जोक तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. SIR प्रक्रियेनंतर बंगळूरू मतदारसंघातील व्होटिंग लिस्टमधून माझं नाव हटवण्यात आलं आहे. चांगला विनोद आहे ना. बंगळुरू मतदारसंघातून SIR अंतर्गत मतदानाचा हक्क हिरावून घेतलेल्या ६५ लाख मतदारांपैकी मी एक आहे. माझा जन्म याच मतदारसंघात झाला, माझे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण येथेच झाले आणि नाट्यक्षेत्रातही येथेच काम केले आहे. तुमच्या माहितीकरिता, मी या ठिकाणी लोकसभा निवडणूकही लढवली. छान. बघू आता माझे मतदार ओळखपत्र मिळवण्यासाठी मला कोणती कागदपत्रे गोळा करावी लागतील. कोणकोणती कागदपत्रे दाखवावी लागतील? असा संतप्त सवाल त्यांनी या व्हिडीओतून केला आहे.

व्हिडीओसोबत प्रकाश राज यांनी एक कॅप्शन लिहले अशून त्यातून मोदी सरकारवर टीका केली आहे. ‘जे तुम्हाला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी कदाचित मतदान करणार नाहीत अशा नागरिकांचा मतदान करण्याचा अधिकार तुम्ही हिसकावून घेऊ शकता. पण तुम्ही ज्या सत्तेच्या खुर्चीवर आहात, तिथून तुम्हाला खाली खेचण्याच्या आमच्या प्रयत्नांना तुम्ही रोखू शकाल का?’, असं त्यांनी म्हटलं आहे