
बारीक चिरलेल्या कांद्याची पेस्ट मिक्सरमधून काढून घ्या. थोडय़ाशा तेलावर ही परतून झाली की, त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, आलं पेस्ट, लाल तिखट आणि टोमॅटो प्युरी टाका. यामध्ये केप्रचा शेवभाजी मसालाही घाला. व्यवस्थित परतून घ्या. यामध्ये साधारण २ कप पाणी घाला. याला उकळी आली की, त्यामध्ये फरसाणातली जाड शेव घाला. हे सगळं छान शिजलं की, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि लिंबू पिळा, ही शेव भाजी पाव किंवा पोळीसोबत खाऊ शकता.
अभिनेता सचिन देशपांडे सगळ्या प्रकारच्या खाण्याची मौज अनुभवतो.
> ‘खाणं’ शब्दाची व्याख्या? – खाणं म्हणजे ‘तृप्तता’.
> खायला काय आवडतं? – शाकाहारी, मांसाहारी दोन्ही आवडतं. विशेषतः चमचमीत जास्त आवडतं. गोड फार खात नाही. पावभाजी, पापलेट आणि बोंबिल फ्राय आवडीचे पदार्थ.
> खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता ? – शक्यतो रात्री भात खात नाही. पोट तुडुंब भरेपर्यंत खात नाही. बाहेरचं खाण्यापेक्षा घरातल्या जेवणाला प्राधान्य देतो. पोळी, भाजी, भात, आमटी खातो.
> डाएट करता का? – विशिष्ट डाएट नाही.
> आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता ? – शूटिंगनिमित्त बाहेर खाणं होतं. तरीही घरच्या जेवणाला प्राधान्य देतो. शूटिंगला जातानाही घरून डबा नेतो. काही वेळा समारंभानिमित्त बाहेर खाणं होतं.
> कोणत्या हॉटेलमध्ये जाता? – मांसाहारात कमी तेलातले स्टार्टर्स , कबाब, तंदुरी असे पदार्थ जास्त आवडतात. हॉटेलमध्ये गेल्यावर सलाड खायला प्राधान्य देतो.
> प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा? – निर्मात्यांनी जे नियोजन केलेलं असतं तिथेच खातो. माझी खाण्याविषयी फार हेच हवं वगैरे आवडनिवड नसल्यामुळे जे मिळेल ते आवडीने खातो. मुळात खायला फार आवडतं त्यामुळे प्रत्येक ठिकाणची स्पेशालिटी चाखून बघतो.
> दौऱयानिमित्त आवडलेला विशेष पदार्थ – नागपूरचं साऊजी चिकन, पुण्यातील यशवंत नाट्यगृहातील कँण्टिनमध्ये अतिशय साधं जेवण आणि बालगंधर्वच्या कँण्टिनमधलं काकांच्या हातचं हाफ फ्राय हे पदार्थ अतिशय आवडतात.
> स्ट्रीट फूड आवडतं का? –गाडीवरचं चायनिज आवडीने खातो.
> घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं ? – प्रयोग करून वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडतात. आईच्या हातची पावभाजी आणि बायकोने केलेलं थालीपिठ खूप आवडतं.
> जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा आवर्जून काय खायला घालता? – काही दिवसांपूर्वी घरी सर्व मित्रांचं गेटटुगेदर होतं. तेव्हा पत्नीने केलेली मिसळपाव सर्वांना आवडली. भरली वांगी, थालीपीठ असे शाकाहारी पदार्थ खाऊ घालतो.
> उपवास करता का ? – दर गुरुवारी करतो.





















































