श्रेया बुगडे झळकणार वेब सिरीजमध्ये!

‘चला हवा येऊ द्या’मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री श्रेया बुगडे आता वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. ‘बायकोला हवं तरी काय’ असे या वेबसीरिजचे नाव असून याचे दिग्दर्शन प्रियदर्शन जाधवने केले आहे. यात श्रेया गृहिणीच्या भूमिकेत झळकणार आहे. श्रेया म्हणाली, माझे पात्र एका गृहिणीचे आहे जिला आपल्या पतीसाठी आणि स्वत:साठी सर्वात चांगलं असं सगळं हवं आहे. या सिरीजमध्ये नवनवीन गोष्टी पाहायला मिळतील. प्रेक्षकांच्या 100 टक्के मनोरंजनाची मी खात्री देते. एमएक्स प्लेअर एक्सक्लुझिव्ह आणि मिर्ची प्ले ओरिजनलची सहा भागांचीं ही वेबसिरीज 4 डिसेंबरपासून एमएक्स प्लेअरवर पाहता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या