
विविध हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता सिद्धांत सूर्यवंशी (46) याचा आज जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाला. त्याच्या अचानक जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे तर मालिका विश्वावर शोककळा पसरली आहे. याआधी राजू श्रीवास्तव आणि दीपेश भान यांचाही जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाला होता.
अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीने आपल्या करीअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली. त्यांना आनंद सूर्यवंशी या नावानेही ओळखले जात होते. ‘कुसुम’ या मालिकेतून त्याने छोटय़ा पडद्यावर पदार्पण केले. याशिवाय त्यांनी अनेक लोकप्रिय टीव्ही शोमध्ये काम केले. ‘कसौटी जिंदगी की’, ‘कृष्ण अर्जुन’, ‘क्या दिल में है’ मालिकांमुळे त्याचे नाव घराघरात पोहोचले. ‘क्यों रिश्तों में कट्टी बत्ती’ आणि ‘जिद्दी दिल’ या त्यांच्या शेवटच्या मालिका होत्या. ‘कुसुम’, ‘वारीस’ आणि ‘सूर्यपुत्र करण’ या त्याच्या मालिका खूप गाजल्या.























































