अभिनेत्याचे व्हॉट्सऍप हॅक, मैत्रिणींना नग्न अवस्थेत केले व्हिडीओ कॉल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 पत्रकार, राजकीय नेत्याच्या सोशल मीडियावरील हेरगिरीचे प्रकरण गाजत असतानाच बॉलिवूडमधील अभिनेत्याचे व्हॉट्सऍप अज्ञात व्यक्तीने हॅक करून त्याच्या मैत्रिणींना नग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल आहे.

तक्रारदार हे अभिनेते असून ते गोरेगाव परिसरात राहतात. सोमवारी रात्री त्याच्या मोबाईलवर फोन आला. त्याचा भाऊ अमेरिकेत असतो. त्याने फोन केला असावा असे तक्रारदारांना वाटले. त्यामुळे त्याने तो फोन घेतला. फोन करणाऱयाने तक्रारदाराकडे ओटीपी (वन टाइम पासवर्ड) आला आहे का असे विचारले. तक्रारदाराने ओटीपी देण्यास नकार दिला. त्यानंतर काही वेळाने तक्रारदारांना मोबाईलवर दोन ओटीपी नंबर आले. त्याच दरम्यान तक्रारदाराच्या पाच मैत्रिणीने त्यांना फोन केला. त्याच्या व्हॉट्सऍपवरून अनोळखी व्यक्ती नग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल करत आहे. फोन करणाऱयाचा चेहरा दिसत नसल्याचे महिलांनी अभिनेत्याला सांगितले.

– या घटनेनंतर हॅकरने 45 जणांना व्हिडीओ कॉल केले. व्हॉट्सऍप हॅक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मित्रांना फोन करून घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्याच्या नंबरवरून येणारे व्हिडीओ कॉल घेऊ नये असे त्यांनी मित्रांना सांगितले. आज पहाटे तक्रारदारांनी घडल्या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाणे गाठून घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.