धक्कादायक! या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झालेला बलात्काराचा प्रयत्न

3120

अनेक अभिनेत्रींनी गेल्या काही वर्षात त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार, बलात्काराच्या घटनांबाबत वाचा फोडली आहे. नुकतंच बिग बॉसच्या कार्यक्रमात अभिनेत्री आरती सिंगने तिच्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत सांगितले आहे. आरती सिंग ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तसेच ती प्रसिद्ध अभिनेता गोविंदाची भाची व विनोदी अभिनेता कृष्णा अभिषेकची छोटी बहिण आहे.

aarti-singh-1

आरतीने बिग बॉसमध्ये तिच्यासोबत घडलेल्या भयंकर प्रकारासोबत सांगितले आहे. ‘मी लहान असताना माझ्या घरातील नोकराने माझ्यावर बलात्काराचा प्रयत्न केला होता. मी घरात एकटी असताना त्याने घरातील सर्व दारं खिडक्या लावून घेतली होती. मी खूप विरोध केला. त्याला मारले व स्वत:ला त्याच्या कचाट्यातून सोडवले. मात्र त्यानंतर पहिल्या माळाच्या गॅलरीतून उडी मारली. त्यानंतर मी बराच काळ नैराश्यात होते. आजही मला बऱ्याचदा पॅनिक अटॅक येतात’, असे आरतीने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या