हिंदी अभिनेत्रीला पतीची मारहाण, सीसीटीव्हीत कैद

92

सामना ऑनलाईन। मुंबई

हिंदी मालिकांमधील अभिनयामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आरजू गोवित्रीकरने पती सिद्धार्थ सबरवाल विरोधात वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पती आपला मानसिक व शारीरिक छळ करत असल्याचा आरोप तिने केला असून मद्यधुंद अवस्थेत पती तिला मारहाण करत असतानाचे सीसीटीव्ही फुटेजही तिने पोलिसांना दिले आहेत. त्यानंतर पोलिसांनी सिद्धार्थ विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

arzooआरजू मॉडेल व अभिनेत्री आदिती गोवित्रीकर हिची धाकटी बहिण आहे. 2010 साली तिचा विवाह सिद्धार्थ बरोबर झाला . त्यांना पाच वर्षांचा मुलगाही आहे. पण पतीला दारुचे व्यसन असल्याने त्यावरून दोघांमध्ये सतत खटके उडत असून सिद्धार्थ आपल्याला मारहाण करत असल्याचा आरोप आरजूने तक्रारीत केला आहे. 15 फेब्रुवारीलाही दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर चिडलेल्या सिद्धार्थने पहाटे 4 च्या सुमारास तिला बाथरुममध्ये खेचत नेले व तिला मारहाण केली. तसेच तिच्या संपूर्ण कुटुंबाला ठार करण्याची त्याने धमकीही दिली. नवऱ्याने माझ्या तोंडावर बुक्का मारला, ज्याला विरोध केल्याने त्याने पुन्हा मारलं असं आरजूने तक्रारीत म्हटले आहे.

arzoo-govitrikar-standingमंगळवारी आरजू आपली बहिण आदिती व त्यांच्या कुटुंबीयांचा जवळचा मित्र असलेला अभिनेता आशिष चौधरी यांच्यासोबत पुन्हा वरळी पोलीस ठाण्यात आली होती. पती तिला न विचारताच मुलाला सोबत घेऊन गेल्याची तक्रारही तिने केली आहे. तक्रारीत तिने आपल्या मुलाचं नवऱ्याने अपहरण केल्याचं म्हटलं आहे. दरम्यान , याबद्दल सिद्धार्थला विचारले असता त्याने हे सगळे नाटक असल्याचा दावा केला. आरजू एका चित्रपटात काम करत असून त्यातील दृश्यांचाच आरजू सराव करत होती. त्यावेळी तिनेच मला तिला मारहाण करण्यास सांगितले. असे सिद्धार्थने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या