
‘कमल’, ‘विषकन्या’, ‘अनुपमा’ या गाजलेल्या मालिकांमुळे घराघरात पोहोचलेली मराठीमोळी अभिनेत्री अश्लेषा सावंत ही वयाच्या 41 व्या वर्षी लग्नबंधनात अडकली आहे.

अश्लेषा सावंत हिने तिचा 47 वर्षीय प्रियकर संदीप बसवाना हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.

तब्बल 23 वर्ष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी अत्यंत साधेपणाने वृंदावन येथील राधा-कृष्ण मंदिरामध्ये लग्न केले.

अश्लेषा सावंत हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे काही खास फोटो शेअर करत चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे.

लग्नामध्ये अश्लेषा हिने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली होती आणि गळ्यात छानसा नेकलेस घातला होता. तर संदीपने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि जॅकेट घातले होते.

आम्ही नुकतेच लग्न केले असून मिस्टर अँड मिसेस म्हणून एका नवीन अध्यायाला सुरुवात केली आहे. सर्वांच्या आशिर्वादांबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, असे कॅप्शन अश्लेषाने फोटोंना दिले आहे.

अश्लेषा आणि संदीपची भेट ‘कमल’ या मालिके दरम्यान झाली होती. त्यावेळी अश्लेषा 18, तर संदीप 24 व र्षांचा होता. गेल्या 23 वर्षांपासून दोघे लिव्ह-इनमध्ये राहत होते.
View this post on Instagram

























































